साडेतीन लाख उसाचे गाळप करणार.खा. संदीपान भुमरे
पैठण, (प्रतिनिधी) : श्री रेणुका देवी सहकारी साखर कारखान्याच्या गाळप क्षमतेत १२.५० वरून २२००मेट्रिकटन करण्यात आली असून या हंगामात साडेतीन लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले.असल्याचे प्रतिपादन संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी केले.
रविवारी श्री रेणुका देवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२५ _२०२६ चा बॉयलर अग्नीप्रतिपादन सोहळा रविवारी
बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे व त्यांच्या पत्नी छाया भुमरे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमदार तथा चेअरमन विलास भुमरे हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमदार तथा चेअरमन विलास भुमरे हे तर प्रमुख उपस्थिती म्हणून छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमास व्हाईस चेअरमन नंदू पठाडे, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, नातं संस्थेचे कार्यकारी विश्वस्त दादा बारे,भारत तवार,भारत लांडगे,प्रदीप वाकडे, लक्ष्मण डांगे,अक्षय डुकरे, विष्णू नवथर,नितीन तांबे, चंद्रकांत गवांदे, भूषण कावसनकर, सुनील हिंगे,शेखर शिंदे, पीए. महेश आंधळे,संजय कस्तुरे, गजू रघुनाथ इछैय्या, बाबाघटे, भीमराव वाकडे , विष्णू वाकडे, नाना गाभूड, सुभाष गोजरे, ब्रह्मदेव नरके,अफसर शेख,पवन चव्हाण, रघुनाथ ठोंबरे, ज्ञानदेव बढे, कारखान्याचे कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय रेवडकर, रोहिदास रेवडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित, उपनिरीक्षक हरिविजय बोबडे. संदिपान काकडे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कारखान्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय रेवडकर, रोहिदास रेवडकर यांनी खा. संदिपान भुमरे यांचा सत्कार केला.